पाथर्डी | प्रतिनिधी
मंगळवार, दिनांक २७ मे २०२५ रोजी मौजे वडगाव (ता. पाथर्डी) येथील भटके विमुक्त कहार समाजातील मच्छीमार कुटुंबांनी स्थानिक विघ्नसंतोषी व्यक्तींविरोधात अन्यायाविरोधात आवाज उठवला. गेल्या अनेक वर्षांपासून काही व्यक्तींकडून विनाकारण आर्थिक व मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे.
यासंदर्भात संबंधित कुटुंबांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किशन चव्हाण यांच्याशी चर्चा करत लेखी निवेदनाद्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवार, दिनांक ९ जून २०२५ रोजी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर भटके विमुक्त कहार कुटुंबांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अधिकार्यांना निवेदन सादर
यासंदर्भात मा. तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांना अधिकृत लेखी निवेदन देण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवर:
- पाथर्डी तालुका अध्यक्ष श्रीकांत (पप्पूशेठ) बोर्डे
- शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई
- समाजसेवक शेख सलीम जिलाणी
- भटके विमुक्त कहार समाजातील मच्छीमार बांधव
मागणी काय?
कुटुंबांनी स्पष्टपणे सांगितले की, त्या विघ्नसंतोषी व्यक्तींकडून त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जातो, ज्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या व्यक्तींविरोधात तातडीने कारवाई करून न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
📲 ताज्या बातम्यांसाठी भेट द्या: abnnewsmarathilive.blogspot.com
💬 WhatsApp चॅनेल जॉइन करा: https://whatsapp.com/channel/0029Vb00YBQ1Xquagb3qEK0R
