मित्रच ठरला शत्रू: २० वर्षांची नोकरी, तरी विश्वासघात!
वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर झालेल्या दरोड्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या दरोड्याची माहिती त्यांच्याच २० वर्षांच्या जुना कर्मचारी व मित्राने दिली होती.
बालासाहेब इंगोले, जो की लड्डा यांचा कटिंग इंचार्ज होता, त्याने घरातील व्यवहार, सोनं-नगदीची माहिती बाहेर लीक केली आणि यामुळेच दरोडेखोरांनी हे मोठं पाऊल उचललं.
अटक करण्यात आलेले ४ आरोपी:
- बालासाहेब चंद्रकांत इंगोले (वय ४६)
- आजिनाथ पुंजाराम जाधव (वय २२)
- गणेश गंगाधर गोराडे (वय २२)
- महेश दादाराव गोराडे (वय २६)
पोलीस तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.
