या
30 मे 2025 | ABN NEWS MARATHI
Vaishnavi Hagwane Case : पुण्यातील विवाहित महिला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाणकडेच वैष्णवीचे बाळ होते. त्याला पुण्यातील बावधन पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर अटक केली आहे. तो 21 मे पासून फरार होता. निलेशवर कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप होता. निलेशच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक बळ मिळणार आहे.
20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून कस्पटे कुटुंबीयांना धमकावले. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोण आहे निलेश चव्हाण?
निलेश चव्हाण हा बिल्डर असून त्याचा पोकलेन मशीनचा देखील व्यवसाय आहे. तो शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्या वादात तो अनेकदा सहभागी होता.
वैष्णवी प्रकरणाशी संबंध काय?निलेश चव्हाण हा बिल्डर असून त्याचा पोकलेन मशीनचा देखील व्यवसाय आहे. तो शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्या वादात तो अनेकदा सहभागी होता.
20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून कस्पटे कुटुंबीयांना धमकावले. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निलेश चव्हाणचा गुन्हेगारी इतिहास:
2019 साली पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी पुण्यातील कर्वेनगरमधील घरावर छापा मारला असून काही महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेण्याची शक्यता आहे. याआधी त्याचा लॅपटॉपही पोलिसांनी जप्त केला आहे.
2019 साली पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.